मी (भाग २)

सध्या मी स्वतःशीच हसते,

जणू पाळण्यातील तान्हुली देवशी गप्पा मारतेय,

बोलता बोलता मध्येच कुठेतरी हरवते,

बहुतेक नव्या प्रेमाची ही चाहूल आहे....

हो. खरंच मी प्रेमात पडले आहे,

कोणाच्या? हे मात्र न उलगडलेलं कोडं आहे,

आजूबाजूचे सगळेच मला सुंदर भासतेय,

नकळत रसिकता माझ्या चेहय्रावर उमटतेय.....

नकोसं सगळही हवंहवसं वाटतंय,

एकटी असूनही कोणीतरी सोबत असल्याचं भास होतोय,

आता कळतंय की मी माझ्याचं प्रेमात पडलीय,

कारण हरवलेली ती मला कायमची सापडलीय.....