कधीतरी उनाडपणे वागायला हवे
तिने त्याला आणि त्याने तिला
बिनधास्त मिठीत घ्यायला हवे
जगाच्या रूढींना न जुमानता
आपणही मग उनाडपणे वागायला हवे
कधीतरी त्याच्यासावे लहानगे व्हावे
गुडघ्यावर बसून मग घोडा व्हावे
ऑफिसला जाताना मग मनसोक्त भिजावे
कधीतरी उनाडपणे वागायला हवे
आपल्या मनातले सर्व गुपित
कोणासमोर तरी मनसोक्त उलगडावे
आपल्या भावनांना वाट करून देताना
मग त्याच्या खांद्याचा हक्काने आधारही घ्यावे
कधीतरी उनाडपणे वागायला हवे
रस्त्यावरची भजी आणि चहा पिताना
hygin विसरायला हवे
fitnessची काळजी न करता
मनसोक्त चॅाकलेट खायला हवे
कधीतरी उनाडपणे वागायला हवे
कधीतरी ऑफिसच्या कामाशिवाय
वसंतरावांची तान ऐकायला हवे
client वरून मन काढून
संगीतात गुंतवायला हवे
कधीतरी उनाडपणे वागायला हवे
डोंगरदर्यात हिंडताना आणि
निसर्गाशी गरबा खेळताना आपली
पत विसरून वागायला हवे
मित्र मैत्रिणीसोबत आयुष्य
पुरेपूर उपभोगायला हवे
एकमेकांची साथ देताना
डोळ्यातील आसवे मात्र लपवायला हवेत
कधीतरी उनाडपणे वागायला हवे
इतरत्र काय बघतो वेड्या
खरा आनंद तर आपल्या कुशीत आहे
पैशापेक्षा जास्त आयुष्यात भावनांना किंमत आहे
स्वतःला ओळखण्यात मित्र खरी मजा आहे
स्वतःला ओळखण्यात मित्र खरी मजा आहे
कधीतरी उनाडपणे वागायला हवे