प्रेम

प्रेम म्हणजे एक सुखद कल्पना
उत्कट जाणीवेची भावना
ओढ आपल्या माणसाच्या सहवासाची
उमललेली कळी गोड चाफेकळीची

प्रेम म्हणजे गर्दीत एकटेपणाची
जाणीव करून देणारे
आणि तिच्या मिठीत असताना
स्वर्गसुख देणारे
नाते आपुलकीने जवळ घेणारे
हक्काच्या मायेने हळुवार जोपासणारे

प्रेम म्हणजे तिने फक्त बघून
गोड हसल्यावर झालेली हुरहूर
आणि मग सत्याची जाणीव
झाल्यावर हृदयाचा होणारा काहूर

प्रेम म्हणजे एकमेकांसाठी केलेला त्याग
एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी
मनापासून केलेला यग्य
काळजातून फुटलेले गोड गाणे
शरीराला फारशी किंमत नसलेले
परमात्म्याचे सुरेख लेणे
रुढींच्या कोंदणातून बाहेर पडण्याचा अट्टाहास
भावनांची अपेक्षापूर्ती करण्यासाठी सतत
केलेला ध्यास

ज्याच्या नुसत्या कल्पनेने
सुद्धा मन मुग्ध होते असे
दृक्श्राव्य काव्य
ज्यांना मिळते त्यांच्यासाठी
स्वर्गसुख
आणि ज्यांना नाही त्यांच्यासाठी
स्वप्नसुख

प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी
करावी अशी हृदयाची पर्वणी
जमून आलीच तर रंभा आणि उर्वशी
नाहीतर स्वप्नातली भावना कायम
जिवंत ठेवणारी सुंदर तरुणीच बरी