नाव किसन बाबूराव हजारे उर्फ अण्णा
सर्व जगभर होत आहे अनंतात गणना....
मिटविण्यासवे भ्रष्टाचार त्यागले आयुष्य फार....
लाभली विवेकानंदांची प्रेरणा
वय अवघे २६ सुरू झाली, नवजीवनाची नवरचना....
सत्य आग्नी, किरणांनी प्रखरले हे जग जैसे
प्रेम शांती भूषण उजळे अरविंद ऐसे.....
लोटला जनसमुदाय सारा
वाहे सत्यक्रांतीचा चि वारा....
हिंदू हो मुस्लिम हो सीख हो ईसाई हो
उठा पेटुनी उठा लढूया एक होऊनी हो.......
जय विजय विसरोनी या हो लढूया रणकंदनी
मिटवूया भ्रष्टाचार आपण अन्नासवे भारत वंदुनी
....... योगेश धिवार