नाते जन्मांतरीचे....(राधाकृष्ण )

नाते जन्मांतरीचे.... (राधाकृष्ण )

रात्रंदिन ध्यास तुझा अंतरीच्या अंतरी
श्वास परी रुंधतसे होय मी बावरी

आज स्वस्थता जीवास लाभे तरी निश्चित
दावूनी गेला प्रभाती काक शकुन सांगत

हृदयीच्या दर्पणी पाहतसे नित तरी
दाटे का अंतरी एक गोड हुरहुरी

रे सख्या शुभघडी ये जवळी क्षणोक्षणी
सगुणरुप दाविसी कृपावंत होऊनी

होऊनी राधासखी भेटणार मी तुला
दिठीभरूनी निरखणार निराकार वत्सला

जन्म जन्म रे हरी तू जिथे मी तिथे
कधी मीरा कधी जनी तुझे रुप कृष्ण ते

नेत्र मिटूनी ध्यानमग्न राधा श्रीचिंतनी
भेटणार भक्तसखी हर्षे हरी मनोमनी....

.......... श्रीमत राधाकृष्णार्पणमस्तू ||