त्यांचे आयुष्य अधिक बोधप्रद असते ?

     आपल्याकडे रामजन्म, कृष्णजन्म लहानांपासून मोठ्यांपर्यंत  अगदी उत्साहात साजरे केले जातात. या जन्मदिवसांचे उत्सव बनून गेले आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक वीरांच्या जयंती केवळ शाळेतच साजऱ्या केल्या जातात. शाळा सोडून बाहेर पडल्यानंतर, नोकरी व्यवसायाला लागल्यानंतर हे दिवस तितक्या उत्साहात साजरे केले जात नाहीत. 
     राम, जन्म हे महापुरुष हजारो वर्षांपूर्वीचे आहेत तर स्वातंत्र्यलढ्यातील वीर पन्नास ते शंभर वर्षांपूर्वीचे आहेत आणि सध्याच्या युगाला राम, कृष्णापेक्षा हेच वीर सर्वार्थाने जवळचे आहेत. 

    हजारो वर्षांपूर्वीच्या महापुरुषांचे चिंतन, भजन, पूजन समाज अधिक करतो. अलीकडच्या महापुरुषांचे विस्मरण होते. 
    असे का ?
    मानवांपेक्षा  देवत्व लाभलेल्यांना महत्त्व जास्त असते व त्यांचे अधिक आयुष्य बोधप्रद असते, असे आहे का ?