भूतकाळ विसरू शकत नाही
वर्तमान जगू शकत नाही
भविष्याची कायम भ्रांतच आहे
आयुष्याच्या दारावर नियतीची थाप आहे
तू गेलीस आणि मी झालो पोरका
अंगणात आता फुलतोय फक्त
आठवणींचा मोगरा
सर्वदूर चराचरात तुझे भास आहेत
कुशीत मात्र अजूनही चाफ्याचा वास आहे
तुझ्या आधाराशिवाय पायात बळ नाही
तुझ्या मिठीशिवाय कोणत्याही भावानेला उब नाही
आतातर गाण्यातही सूर लागत नाही
नियतीने केलेली अगतिकता असह्य होत आहे
पाऊले मात्र भूतकाळाच्या वाटेवरच घुटमळत आहेत
तुझ्यासवे आयुष्याचा गुलमोहर फुलला होता
पण आता तुझ्या नसण्याने यशाचा
मोहर हि फिक्का वाटतो आहे
तुझ्याशिवाय जगणं म्हणजे अखंड कारावास
स्वप्नात तुझे कायम भास
मनात उरलाय फक्त परमेश्वराच्या
कृपेचा ध्यास
तू आहेस, तू येशील, तू कायम असशील हाच
एक दृढविश्वास