मी मराठी

मातीत या जन्मलो
मातीत या खेळलो
धैर्याने येथेच वाढलो
निधड्या छातीने कायम जगलो
माय मराठी आमची आई
धैर्य नाही कोणात येई समोर आमच्या
बोलतो मराठी चालतो मराठी
अभिमान आहे मी मराठी

येथेच झाले टिळक, सावरकर
येथेच जाहले फाळके आणि मंगेशकर
आहेत मानबिंदू माशाळकर आणि तेंडूलकर
झाले बहू होतील बहुत
आम्हीच आहोत या देशाचे कौतुक

शिवरायांनी केले मुघ्लास जमीनदोस्त
किर्लोस्करांनी आणि देशपांडयांनी
सावरली व्यवस्थापनाची भिस्त
संत संस्कार याच मातीत घडले
अष्टविनायक हि येथेच जाहले

वैभवशाली इतिहास आमुचा
ध्येय गाठण्या भविष्यातही विश्वास आमुचा
अटकेपार झेंडे रोविले आम्ही
या धारेवर मोहर लावण्या निर्धार आमुचा

सर्व भाषिकांचा मन राखला आम्ही
वाकड्यात शिरेल कोणी तर
लंगोटी हि ठेवणार नाही आम्ही
डोळ्यात वाहते कृष्णामाई
हृदयात आहे संतवाणी
दहा गजांचे बळ मनगटात आमच्या
न ढळणारा कणखर बाणा आमचा
मोडणार नाही कणा कधी
वाघाची आहे हिम्मत आमची
रक्तही सळसळते तलवारही तळपते
मी मराठी, मी मराठी