सांगितले होते तुम्हाला
नका भेटू एकाही कवीला
नाही पाळलेत पथ्य
झालात ना अस्वस्थ
नको तेव्हढी खाल्लीत वृत्ते
मात्रांनाही केलेत फस्त ते
फुगले ना पोट
झाली ना गझल.
नाही पाळलेत पथ्य
झालात ना अस्वस्थ
यमकनगरीत भेटले ना भट
मीर, गालीब, प्रल्हाद
शब्द खाल्ला की लगेच गझल
काफिया चाखना म्हणून घेतलात
रदीफ होतेच स्वस्त
नाही पाळलेत पथ्य
झालात ना अस्वस्थ
उपाय आता एकच
करा चटणी नवाझांची
भरा मिसरा पावात
मतल्याला घाला चुलीत
चवीला घ्या गझलारिष्ट
नाही पाळलेत पथ्य
झालात ना अस्वस्थ
किती? पाव शेर लिहीलात
झाली ना बाधा
किती भकास झालात,
कान पाडलेत, लाळ गळते आहे
गझलोफोबियाच्या धुंदीत मस्त
नाही पाळलेत पथ्य
झालात ना अस्वस्थ