फुलतात प्रीतवेडे; प्राजक्त भावनांचे
नातेच गोतवेडे; आसक्त श्रावणाचे
आतूर श्वास भोळा; वारा उरी धपापे
आकाश भारओले; रानी मयूर नाचे
संकेत हा कशाचा ? ओळीत शब्दकोडे !
संवाद वा स्वरांचा ? हृदयास गीत छेडे !!
गेले सरून जे जे; सारेज़ उधाण त्याचे
अंगण भरून भारे; कोरीव चंदनाचे
........................अज्ञात