आयुष्य

आई वडील म्हणतात म्हणून
होतो आपण इंजिनियर किंवा डॉक्टर
आणि मग झटत राहतो आयुष्यभर
साधण्यासाठी संपत्तीचा डोंगर

तेच काम, तीच प्रगती, आणि तोच पगार
रटाळ आयुष्याचा खुंटतो मग उद्धार
कालच्या सारखा आजचा आणि
आजच्या सारखा उद्याचा दिवस जातो ढळून
जाणीव मात्र डोकावते परिस्थितीच्या आड दडून

प्रगती होऊन जाते आयुष्याचे लक्ष्य
कुटुंबीयांकडे होते मग अजाणतेपणे दुर्लक्ष्य
मित्र वाट बघतात कट्यावर मनात आणून
आपण मात्र वाहत राहतो जवाबदारीची धुणी

एकेक दिवस मग खर्ची पडतो असाच कर्तव्यासाठी
कळतच नाही कधी ओलांडतो आपण
आयुष्याची पन्नाशी
उमगते मग शरीरात नाही बळ आणि
तोंडात नाही बत्तीशी
आयुष्याची उमगलीच नाही कधी आपल्याला हि खेळी

स्वतःसाठी स्वतःचा असावा
रोज एक तास
आयुष्याची कोडी उलगडण्यासाठीच
करायचा असतो हा अभ्यास
व्यर्थ आहे झगडणे मिळण्यासाठी मान आणि सन्मान
स्वताःतला 'मी' शोधण्यासाठी करावे कायम
जीवाचे रान
शेवटी यातूनच मिळते खरे आत्मिक
समाधान