श्रावण दारी....
श्रावण दारी मना हुरहुरी....थांब ना सख्या जरा क्षणभरी
श्रावण वैरी साजण दूरी.....गळा हुंदका नजर भिरभिरी
श्रावण रानी लखलख पानी....दिठी विस्फारे लक्षदर्पणी
श्रावण झारी रेशीमधारी....सरसर येता फिर माघारी
श्रावण उन्हे मृदू सोनेरी.....सलज्ज हासू धरणी मुखावरी
श्रावण ताजा गंधित हिरवा...... चहुबाजूंनी बरवा बरवा
श्रावण गाणे मधुर तराणे.....अंतरी आलापींचे लेणे
श्रावण कान्हा राधा अवनी....टिपरी वाजे थेंब होऊनी