थकला जीव थकले शरीर
थकले मन थकल्या भावना
आधार नाही पोटच्या लेकरांचा
आशीर्वाद नाही वरच्या परमात्म्याचा
काढले चिमटे पोटाला, शिकवले लेकराला
झाले मोठे गेले निघून पर देशीला
डॉलर आणि पाउंडचे प्रेम मात्र
मिळत राहते महिन्याच्या सुरुवातीला
तब्येतीची काळजी घ्यायला
नर्स आहे २४ तासाची
मायेने हात ठेवण्या मात्र
सून किवा मुलगी नाही हक्काची
वार्ध्यक्य जड झाले शरीरावर
राहिला नाही विश्वास नशिबावर
जे नव्हते आपले ते सोडूनी गेले
उरले फक्त आयुष्याच्या बेरीज
वजाबाकीचे आकडे
ठरविले आता सत्कार कल्पनांचा
संकल्प नवीन आयुष्य जगण्याचा
आहे त्यात आनंद मानून राहून गेलेल्या
स्वप्नांना पूर्ण करण्याचा
2nd इनिंग यशस्वी करण्याचा
एकमेकांना साथ देऊन मनसोक्त
आयुष्य जगण्याचा