तू गजानन तूच अनंता
तूच माझा पालक तूच विघ्नहर्ता
तुझ्या चरणी ठेविला माथा
तूच गणपती तूच जगन्नाथा
तुझ्या चरणी हरपलो भान मी
न राहिलो माझाच मी
हरले साशंक मन माझे
ठेव विनायक शिरावर हात तुझा
गोड मानुनी घे भक्तीचा ठेवा माझा
तूच निरंकार परमेश्वर
तूच सर्वांच्या बुद्धीचा मोहर
तूच जागेपणी तूच स्वप्नात
तूच जीवनाचा शिल्पकार साक्षात
वंदितो प्रथम तुला परमेश्वरा
कृपासिंधू तू रिद्धी सिद्धीच्या वरा
तूच तू सिद्धीदाता बल्लाळेश्वरा
तूच मंगलमुर्ती मोरया मोरेश्वरा
होईल आयुष्याचा भवसिंधू पार
राहील जर तुझा आशीर्वाद अपार
माझ्या भक्तीला साथ तुझ्या शक्तीची मोरया
मंगलमुर्ती मोरया मंगलमुर्ती मोरया