व्यवस्था विवाह

लग्न संस्कार दोन जीवांचा
बाजार मांडलाय भावनांचा
जुळवी म्हणे नाती परमेश्वर वरती
नटून उभी सर्वांसमोर भाऊक युवती
घायाळ नजरा टिकती तिच्यावरती

नुसते पाहुनी म्हणे पसंत करायचे त्यास
वर जो होणार आयुष्याचा जोडीदार
न वात्सल्य ना भावना ना प्रेम त्यास
सगळा नुसता आहे नशिबाचा जुगार

स्वतःचे भवितव्य मग नियतीच्या तव्यावर
पूर्ण उतरावे लागते समाजाच्या मागण्यांवर
नसतो विचार मनाचा, खेळ फक्त बुद्धीचा
मोहर जसा चेफेकालीला पारिजातकाचा

अश्रू लपवून भेटते कायम सर्वांना
सलाम कोंदण तोडू न शकणार्या तिच्या संस्कारांना
भाषणे प्रेम विवाहावर फक्त चालतात समाजात
अजूनही स्त्री लाजरीसारखी उभी आहे
रुढींच्या रिंगणात

स्वप्नातला राजकुमार स्वप्नातच
आयुष्य मात्र जगते वास्तव्यातच
जुळून आली तर आहे पर्वणी आयुष्याची
नाहीतर आयुष्यभर भावनांची झोळी राहते उशाशी