ती रात्र

मलमली रात्र हि सरू नये
तू अशीच असावी माझ्या सवे
स्पर्श तुझा आज वेगळा भासे
साक्षात गंधर्व माझ्यात वसे

तुझ्या स्पर्शाने रोमरोम आनंदले
जसे मेनकेने शरीरावर अत्तर मंतरले
दीर्घ श्वास उष्ण वाटे मला
घट्ट मिठीत स्वर्गसुख लाभे मला

काळ्याभोर तुझ्या केसांचे सावट चेहऱ्यावर माझ्या
गालिबची गझल होईल कमसीन बांध्यावर तुझ्या
ओठांची ओठांना उमगली हि सलगी
वाट ही मोहाची मला गवसली

तुझ्या गोऱ्या नितळ कांतीचे दर्शन म्हणजे
उमगली भैरवी क्षणात
प्रेमात पडेल देवराज इंद्र सुद्धा साक्षात
कातील इशारे नजरेचे म्हणजे मदनबाण
कुशीत घेऊन तुला झालो मी रममाण

अजूनही ती रात्र आठवली कि ते
क्षण जसेच्या तसे उभे राहतात
तन आणि मन मग हर्षाने मोहून टाकतात
स्वर्गसुख काय ते त्या रात्री कळाले
उरलेले आयुष्य मग त्याच्या आठवणीतच सरले