(चाल-- पिंजरा सिनेमातील गाणं "हे वागणं बरं नव्हं)
शेतकर्यांना नुकसान भरपईचं पॅकेज घोषीत झालं की शेतकर्यापेक्षा
राजकारण्यांनाच जास्त आनंद होतो. एका मंत्र्याचे हस्तक काय म्हणतात ते
बघा!
लगबग करा की पॅकेज आलं
आज सकाळी दिसलयं कोल्हं
अहो मंत्रीजी, चला निघू मुंबईला
हे थांबणं बरं नव्हं
डावा तळवा खाजवतोय
मनात घंटा वजवतोय
लक्ष्मीदेवी खुश दिसते
म्हणते खिशात मी बसते
आता सोडा आळस, भाग्याचा दिसतोय कळस
हे थांबणं बरं नव्हं
शेतकर्याचं होईल भलं
कर्ज डोईचं खारिज केलं
बँके मार्फत दिल्यावरी
अपुलं कसलं चांगभलं?
होळीच सण आमचा, असून तुमचा चमचा
हे थांबणं बरं नव्हं
शेतकर्याच्या अर्जावरी
एम.एल.ए.ची सही हवी
कायद्यात हा बदल करा
करा कायदा नवा जरा
भेटा सि.एम.ला, सोबत न्या हो मला
हे थांबणं बरं नव्हं
पाऊस पडेल नोटांचा
पैसा हौशा गौशाचा
प्रत्येकाला पॅकेज देऊ
त्यातील आपण खूप ठेऊ
धन कुठे लपवू? स्वित्झरलंडला चला
हे थांबणं बरं नव्हं
डाक बंगला सरकारी
सर्वच तेथे गुणकारी
पार्टी ओलीओली असेल
आपणा सोडुन कुणी नसेल
येईल मोना, फाटूद्या चोळीचा कोना
हे थांबणं बरं नव्हं
टीप :- वरील रचना चालीवर गुणगुणल्या जास्त स्वाद येईल
निशिकांत देशपांडे मों न. ९८९०७ ९९०२३