एकटं

एकटं

एकटं वाटतंय
फारच वाटतंय

अंधार मन
सतत फाटतंय

देवापुढचा दिवा
नुसताच मिणमीणतो

रातकिड्यांचा आवाज
काळजात भिनतो

पक्षांचा किलबिलाट
वाटतो कलकलाट

वाऱ्याची झुळुक
लाव्हाची लाट

एकटं वाटतंय
फारच वाटतंय

लडखडणारं आयुष्य
जगण्यासाठी झटतंय

राजेंद्र देवी