शहरातल घर प्रत्येकालाच हवं असतं
२ नाही तर १ BHK वरच चालवायच असतं
कर्जाचे गाठोडे डोक्यावर घेऊन मिरवायचं असतं
परतफेड करण्यासाठी आयुष्यभर जीवाचं रान करायचं असतं
त्या घरात राहण्यासाठी वेळ आवर्जून काढावा लागतो
सुट्टीच्या दिवशी तो बाहेरच घालवावासा वाटतो
समोर कोण राहते याचा सुगावा नसतो
अनोळखी चेहऱ्याने सणासुदीला मात्र एकमेकांना भेटतो
घराला घरपण देणारी स्त्री सुद्धा
मग त्याच घरासाठी उंबरठा ओलांडते
घरातील सार्या जवाबदाऱ्या मग
मोलकरणीवर सोपवते
घराची संकल्पना त्या लहानग्याला
मग फलॅट रूपातच उमगते
आपुलकी आणि माया मग चार भिंतीआड डोकावते
ज्या घरासाठी करतो आपण जीवाचं रान
त्यात नसते आस्था आणि प्रेमाला स्थान
झगडतो २४ X ७ आपण सोडून सारी सलगी
उमगते मग उलटून गेली वयाची चाळीशी
लहान असले तरी ते घर असावे
भाड्याच्या घरात पण आपलेपण जपावे
सर्वांसाठी वेळ देऊन जितके उरते
त्यातच ते वसावे
मोठ्या आकाराचा उंबरठ्यापेक्षा मायेच्या तोरणाची
आस असावी
स्वप्न पूर्ण करताना मायेची
नाती मात्र घट्ट धरून ठेवावी