गोष्ट आहे एका भोळ्या भाबड्याची
पहिली स्वप्ने त्याने यशस्वी होण्याची
कोणत्या ग्रहाची दृष्ट त्याला लागली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली
बालपणात भोगल्या त्याने हाल आणि अपेष्टा
नोकरीत पण झाला तो कायमच द्वेष्टा
त्याच्या कष्टाची नशिबाने चेष्टा मांडली
आज त्याच्या अपेक्षांची चीता जाळली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली
मोठ्या आशेने केले त्याने लग्न
पाहिली तिच्यासवे सुखी संसाराची स्वप्न
सोडून पवित्र बंधन ती नार गेली
त्याला एकटेपणाची शिदोरी तिने दिली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली
सुखी समाधानी होते आई आणि बाप
केले नाही त्यांनी कधी काही एक पाप
त्यांची नातवंडांची आस राहून गेली
परिस्थितीने आज त्यांची पाठ मोडली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली
निर्मल आणि स्वच्छ होते आजवर चारित्र्य
जपले होते त्याने प्रत्येक नात्यामधले पावित्र्य
सुन्या काळजाची तार तिने छेडली
तरी संस्काराची कास नाही सोडली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली
होता त्याला परमेश्वर भक्तीचा ध्यास
सोडून सारे पाश त्याने केला अट्टाहास
आयुष्याची नवका दुसऱ्या किनारी लागली
नशिबाने आज हि वाट दाखवली
कशी नशिबाने वाट हि गवसली