सहल

सहल कायम सुखद आठवणींची साठवण
डोंगर दऱ्यात किंवा रिसोर्ट मध्ये घालवलेला प्रत्येक क्षण
मित्र मैत्रिणींचा बिनधास्त सहवास
स्वच्छंद पणे जगलेला एक उनाड दिवस

मिनिरल वॅ।टर ची जागा झऱ्यातील पाणी घेत
मन पण मग सगळे हायजीन विसरून मातीत लोळत
मनसोक्त पावसात भिजताना उमगतो जगण्याचा आनंद
कटिंग आणि वडापाव खाताना कळते हेच खरे जगणे स्वच्छंद

प्रवासात चालतो एकमेकांवर ताशेर्यांचा खेळ निवांत
सिनेमातले नवे जुने कलाकार होतात मग नकले मधून जिवंत
अंताक्षरी च्या निमित्याने रंगते सर्वभाषिक गाण्याची मैफिल सुरेख
नकळत मग वाढत जातो आवाजाचा आणि मस्तीचा आलेख

न खेळणारा माणूस सुद्धा खेळतो जीव ओतून
वॉलीबॉल सुद्धा मग हसतो २ आउट देऊन
सहवास, मैत्री आणि भावनांचा रंगतो पुन्हा नवीन खेळ
महिन्यातून एकदातरी साधावा परिस्तिथी आणि भास-अभासा चा मेळ.