पुन्हा एकदा 'सैंयो माही विछड गया मेरा'

 'सैयों माही विछड गया मेरा' हे नसरत फतेह अलींचं गाणं माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक. अर्थात मला आवडतं म्हणून इतरांनाही ते आवडेल किंवा आवडावं असं नाही. पण इतरांना ते ऐकवावं असं मात्र वाटतं.मध्यंतरी मनोगतावर या गाण्यासंबंधी लिहिलं होतं. पण त्या वेळी नेमका या गाण्याचा दुवा यूट्यूब वरून गायब झाला होता. माझ्याकडेही डाउनलोड केलेलं नव्हतं. या गाण्याने इतकं पछाडलं होतं की दर काही दिवसांनी यूट्यूबवर माझा शोध सुरू होताच. आणि आज अचानक ते सापडलं, कुणीतरी अपलोड केलेलं. ज्या कुणी ते केलं त्याला माझे शतशः धन्यवाद.

हे गाणं त्यांच्या प्रसिद्ध किंवा लोकप्रिय गाण्यांत गणलं जात नाही. (लोकरंजनासाठी केलेलं) काही कोरीवकामही त्यात जाणवतं. थोडंसं सजवणं, क्राफ्टसमनशिप, गिमिक्स असं काहीसं. पण ते आवडतं हे खरं. विशेषतः त्यातला ठेका डोक्यात भिनतो. हे एक विरहगीत आहे कदाचित सूफी तत्त्वज्ञानाची थोडीशी डूब असलेलं. हे गाणं दोन भागात आहे.

पाहा आवडतं का.