विसरेन मी..

विसरेन मी जगाला ,विसरू कशी तुला मी,

आस तुझी मनात, हरवू कशी तिला मी..
या गीतपंक्ती तुझ्याच, त्या गुणगुणू कशा मी
हे अश्रू असती तुझेच, ढाळू तरी कसे मी..
मम जीव ही तुझाच, त्यागू तरी कसा मी
विसरेन मी स्वताला, विसरू कशी तुला मी...