अप्रयाजल म्हणजे अप्रयाजल असते
सर्वांचे साधारण सेमच असते
काही मर्जीतल्या लोकांचे मात्र चांगले असते
बाकीच्यांचे स्वप्न नेहमीसारखे मोडलेलेच असते
कधी ऑन साईट चे गाजर असते
तर कधी प्रमोशनचे आश्वासन असते
सीटीसी च्या ग्रेड चे राजकारण असते
नोर्मालायझेशन मुले इन हेंड मात्र सेमच असते
परफोर्मंस शी संबंध नसलेली थट्टा असते
आपल्यापेक्षा दुसऱ्याची नेहमीच चांगली असते
समाधानाची लेवल कायम कमीच असते
अत्रिअशन चे हेच मूळ कारण असते
कसेही असले तरी केआरे दरवर्षी भरायचे असते
कोठेही गेले तरी परिस्तिथी साधारण सेमच असते
जे मिळेल ते आनंदाने स्वीकारायचे असते
आणि दुसरी चांगली मिळाली कि सुटायचे असते