ते एक छोटंसं फुल पाखरू
दोष त्याचा नाही मुळी
खेळ थोरा मोठ्यांचा.. पण,
आनंद जगण्याचा हरवलेलं
इकडून तिकडे बागडत
येणाऱ्यांकडे आशेने बघत
जाणाऱ्यांच्या भावना भोगत
करुणेसाठी जगाच्या हपापलेलं
उनपाऊस त्याला सारखंच
बधिरतेच्या जाणीवेनं सोसत
दिवस रात्र खेळ निसर्गाचा
अंधारात रात्रीच्या गांजलेलं
हो ! ,हो मी पाहिलंय!
काका म्हणत बिलगलेलं
जास्तीची गरज नाही त्याची
एका प्रेमाच्या करंजीने हसलेलं!....... हो खरंच! , मी पाहिलंय!
( एकदा माझ्या बहिणी बरोबर अनाथ आश्रमात जाण्याचा प्रसंग आला पण आश्रमाच्या आत जाण्याच धाडसच झालं नाही ! , न जाणो कोणी मामा म्हणून हाक मारावी आणी...... )