पीळ

पीळ

बोलवूनही मेघ न आले
नाही झाले डोळे ओले
नशीब माझे कोठे हुकले
आयुष्य का कमी पिकले

आठवणींचा बाजार नुसता
सजले रस्तोरस्ती ठेले
कसे चुकवू पायवाटांना
हाक मारती गवतफुले

अजूनही ये
मला वेळ आहे
तुझ्या आठवणीचा
हृदयात पीळ आहे

राजेंद्र देवी