हा श्वास वेडा गुदमरतो देवा
निर्मळ दवाचा मी करतो हेवा
ऊडून गेला गंध कधीचा रे
पोशाख पाला पांघरतो देवा
वाट्यास त्याच्या हे सुख का देवा
त्याच्या शवाचा मी करतो हेवा
माझे नसे काहीच तरी दावा
फासेच ऊलट का धरतो देवा
त्या मोगऱ्याचा जन्म नको देवा
ऊन्माद तो अल्पच ठरतो देवा
शून्यात वाहे जीवन माझे हे
निष्प्राण गारा, बावरतो देवा
मी मागतो रे नित्य असो सोबत
हा तूच तो माझी स्मरतो सेवा
ऊजाड झाले रान मनीचे रे
बेभान देही थरथरतो ठेवा