कोणीतरी

कोणी तरी आपल्यासाठी गुणगुणावे
आणि आपण त्याचे गाणे करावे
कोणी तरी छेडावी नवी लकेर
आणि आपण तिच्या भोवती धरावा फेर
कुठे तरी गावसावा एक रंग बिंदू
आणि मन रंगात न्हावे
एकच कवडसा पडावा असा की
सारे जगणेच प्रकाश व्हावे

- रमामंजिरी