ही बाडगुळेच आता खाताहेत सारी पाळेमुळे
हा क्षीण झाला महाराष्ट्रवृक्ष आपल्यातीलच त्रूटींमुळे
बांधावरचे निवडुंग हे बळकावतील शेतमळे
राखणीचे कामही ना मिळे स्वाभिमानाच्या विस्मृतीमुळे
आपलाच एकेकजण दूर जातो स्वतंत्र कृतीमुळे
बोकाळते अनिष्ट सारे, सत्य पोटात ठेवण्याच्या तत्त्वामुळे
जो आला तो रमला ह्या निर्ढावलेल्या पद्धतीमुळे
सहज वरचढ होतात येणारे ह्या सुस्त प्रवृत्तीमुळे
घडेल का मनजागृती शिवरायांच्या पुण्यस्मृतीमुळे?
वास्तवाला थेट भेटण्याच्या मराठी जिद्दीमुळे॥