बेगडी पायीच मी ही लागलो पडाया
तोडतो बेडीच आता लागलो नडाया
तीरडी केलीच त्यांनी माझिया शिडीची
लोटलो तेंव्हाच जेंव्हा लागलो चढाया
शांत होतो जन्म सारा ना कधी तक्रारी
पोळलो तेंव्हाच जेंव्हा लागलो लढाया
ताठ होती मान माझी सत्य वागलो मी
मोडलो तेंव्हाच जेंव्हा लागलो घडाया
आप्त माझे बोलती, मारू नको बढाया
आज मी ही भार झालो लागलो दडाया
बेगडी पायीच मी ही लागलो पडाया
तोडतो बेडीच आता लागलो नडाया