काळ हा सोबतीला दो क्षणाचा
झोपला देह माझा तो मघाचा
संपला स्नेह भूमीचा अता हा
ताटवा भोवतीला तो फुलाचा
कापली बंधने कोणीतरी ती
आज होणार संगच कोळशाचा
अश्म आता कसा हा ठोकरावा
एकही पाय नाही सोवळ्याचा
व्हायला हो नको तो कावळा मी
तो नको जन्म आता भोगण्याचा
रोज जपतोच मी रिक्त मडक्याला
आप्त आनंद घेती फ़ोडण्याचा