मराठी मातीवर(चालः मेंदीच्या पानावर... )
मराठी मातीवर, भय जून झुलते गं
ताईच्या भावंडा काम ना मिळते गं
मराठी मातीवर.....
झुळझुळतो महाराष्ट्रात, तोच उपरा वारा गं
हुळहुळतो मराठीचा, अजून देश सारा गं
मराठी मातीवर....
अजून तुझे नोकरीचे, वय नाही संपले गं
अजून तुझ्या रक्तातील, साधेपण कवळे गं