पखाली

पखाली

मनातल्या डोहात
थेंब आठवणींचे टपकती
भावनेचे तरंग उठती
डोळ्यांच्या किनारी विरती

आठवणीच्या डोहात
मन मोट बुडाली
रोज वाहतो मी
भरभरून पखाली

राजेंद्र देवी