राम गबाले आणि इंग्रजी विकिपीडिया

श्रेया नातू नावाच्या मुलीने  इंग्रजी विकिपीडियावर 'राम गबाले' या नावाचा त्यांचा परिचय करून देणारा लेख लिहिला होता.  त्या लेखात लेखिकेने राम गबाले यांची आणि त्यांच्या चित्रपटकारकीर्दीविषयीची भरपूर माहिती  प्रयत्नपूर्वक मिळवून समाविष्ट केली होती.   इंग्रजी विकिपीडियाच्या मते राम गबाले या बिनमहत्त्वाच्या व्यक्तीवर लेख लिहिण्याचे कारणच नाही.  ती व्यक्ती मोठी होती हे, आणि तो लेख विकीवर असणे योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना भरपूर संदर्भ हवे होते. विकिपीडियावर एरवी एखादाच सामना खेळलेला खेळाडू, चर्चचे पाद्री, दक्षिणी भारतीय फालतू सिनेमा नट्या यांच्यावर पानावर पाने सापडतात. पण त्यांना राम गबाले यांची, बहुधा ते मराठी होते म्हणून ऍलर्जी असावी.  इंग्रजी  विकीवर मराठी भाषा, मराठी लोक आणि संस्कृती यांच्याबद्दल अनेकदा चुकीची, विकृत आणि द्वेषमूलक माहिती असते.  उदाहरणादाखल दीनानाथ मंगेशकर यांच्यावरील लेख पाहावा.  आणखीही उदाहरणे देता येतील. मराठी भाषेला महाराष्ट्रात मरहट्टी, मर्हाटी, महारठ्ठी या नावाने ओळखतात.  मराठीतील हाताच्या बोटावर मोजता येतील अशाच चारदोन विद्वानांनाच 'ष'चा उच्चार करता येतो, वगैरे वगैरे.

सध्या इंग्रजी विकीने 'राम गबाले'काढून टाकला असून तूर्त तो श्रेया नातू हिच्या सदस्यपानावर आहे.  सदस्यपानावरील तो लेख आणि त्यावरच्या   चर्चापानावरील  विकीच्या संपादकांनी आणि अन्य सदस्यांनी तोडलेले तारे अवश्य वाचावेत, आणि इंग्रजी विकीचा निषेध करावा.