प्रार्थना...२
देवापाशी बोलण्याचा
हाच एक मार्ग भला
सांगू त्यासी सुख-दु:ख
सखा परि तो आगळा १
त्याला कळतेना ऐसे
जगी नाही गोठी परि
गुजगोष्टी सख्यापाशी
गोडी प्रार्थनेची खरी २
अन्न वस्त्र धन मान
सर्व प्रारब्धा आधीन
तुका दावी खूण घ्यावी
ज्याची त्याने ओळखून ३
करी लेकराशी प्रीती
माय जाणीना वेव्हार
पुढे सांभाळ करी का
तरी दूध पाजणार ४
ऐसी कळवळा जाती
लाभाविण करी प्रीती
संत शिकविती तैशी
करु प्रार्थनेची गोठी ५
देवापाशी आहे खास
प्रेम भक्ति भाव देणे
वरि मिळे सुख शांती
नाही लौकिक लोढणे ६