तर्कशास्त्र (अजब)

     मला आवडलेल्या एका विरोपाचा अनुवाद
     विजय संगणक कार्य प्रणालीत पदवी धारण करून आपला एक मित्र सॉफ्ट्वेअरच्या चाचणी (software testing)तील तज्ञ असल्याने त्याच्याकडे जाऊन ती विद्याही त्याने आपल्याला शिकवावी अशी गळ त्याला घालतो.पण हा गुरू काही काळ त्याच्याकडे पाहून जणू काही त्याया अंदाज घेत  त्याला म्हणतो, "हे बघ तुझा उद्देश चांगला आहे पण मला नाही वाटत तू अजून ती विद्या शिकण्याइतकी तुझी तयारी झालीय तरीही तुझा आग्रहच असेल तर तुझी तर्कशास्त्रात कितपत तयारी आहे याची चाचणी घेतो आणि त्यात तू उत्तीर्ण झालास तर तुला हवे ते शिक्षण मी देईन "
    विजयने तशी तयारी दर्शवल्यावर गुरूने आपली दोन बोटे दाखवीत विचारले,"दोन माणसे धुराड्यातून खाली येतात, एकाचा चेहरा घाण झाला आहे आणि दुसऱ्याचा मात्र स्वच्छ आहे तर कोणता माणूस आपला चेहरा धुवून टाकेल? "
"ही तर्कशास्त्राचीच चाचणी आहे ना?" हा कसला प्रश्न अशा थाटात विजय विचारतो व गुरू मान डोलावतो
"अर्थातच ज्याचा चेहरा घाण झाला आहे तोच"  तो उत्तर देतो
"सपशेल चूक "गुरू म्हणतो
"मग काय उत्तर आहे? " विजय आश्चर्याने विचारतो
"उत्तर आहे ज्याचा चेहरा स्वच्छ आहे तो. अगदी सोपे तर्कशास्त्र आहे ‍ज्याचा चेहरा घाण आहे तो दुसऱ्याकडे पाहील व आपला चेहराही स्वच्छ आहे असे त्याला वाटेल उलट ज्याचा चेहरा स्वच्छ आहे तो मात्र दुसऱ्याचा चेहरा पाहून आपलाही चेहरा घाण झाला आहे असे समजून तो स्वच्छ करायला पळणार"". 
 "खरच की " विजय असे म्हणून "कृपया आणखी एकदा चाचणी घ्या "असा आग्रह करतो.
"ठीक आहे "म्हणून पुन्हा दोन बोटे दाखवत गुरू तोच प्रश्न विचारतो. आता मात्र कमाल आहे असा आविर्भाव करत मघाच्या अनुभवाने शहाणा झालेला विजय उत्तर देतो. "ज्याचा चेहरा स्वच्छ आहे तोच" व आता बरोबर उत्तर दिले अशा आनंदात गुरूकडे मोठ्या आशेने पाहतो तोच थोबाडीत बसावी तसा गुरू " चूक पुन्हा चूक "असे त्याला बजावतो. आणी पुढे म्हणतो,
"यामागील कारण असे आहे की स्वच्छ चेहरा असणारा चेहरा साफ करायला गेलेला पाहून चेहरा घाण असणाऱ्यालाही संशय येतो की आपलाही चेहरा घाण झाला आहे की काय म्हणून तोपण चेहरा साफ करायला जातो म्हणजेच दोघेही चेहरा साफ करतात "
"हे माझ्या लक्षातच आले नाही " विजय म्हणतो, "बर आता पुन्हा एकदा घ्या ना चाचणी"
त्यावर गुरूने आपली दोन बोटे दाखवीत विचारले"दोन माणसे धुराड्यातून खाली येतात, एकाचा चेहरा घाण झाला आहे तर दुसऱ्याचा मात्र स्वच्छ आहे तर कोणता माणूस आपला चेहरा धुवून टाकेल? "
"दोघेही चेहरा साफ करतील"थोडाही विचार न करता " विजयने उत्तर दिले.
"पुन्हा चूक, दोघापैकी कोणीच चेहरा साफ करणार नाही. "गुरूने त्याला पुन्हा आश्चर्याचा धक्का दिला तो पुढे म्हणाला "अगदी साधे सोपे तर्कशास्त्र त्यामागे आहे‍. ज्याचा चेहरा घाण झालेला आहे तो दुसऱ्या  माणासाकडे पाहील व आपलाही चेहरा स्वच्छ आहे असे समजेल़. उलट ज्याचा चेहरा स्वच्छ आहे असा माणूस दुसऱ्याकडे पाहील व आपला चेहराही घाण झाला आहे असा त्याचा समज होईल.पण त्याचबरोबर स्वतःचा चेहरा घाण झाला आहे हे समजूनही समोरचा माणूस तो  स्वच्छ करण्यास  जात नाही असे पाहून तो पण चेहरा साफ करत नाही अश्या रीतीने दोघांपकी कोणीच चेहरा साफ करत नाही. " हे ऐकून विजय एकदम वैतागून म्हणतो, "पण तरी मला सॉफ्ट्वेअर तपासणीचा अभ्यासक्रम पार पाडायचाच आहे. आता कृपा करून एकदाच मला चाचणीप्रश्न विचार. आणी गुरू मात्र हाताची दोन बोटे उचलत आपली तीच प्रश्न तबकडी पुन्हा वाजवतो. विजय यावेळी उत्तर देतो, "कोणीच चेहरा साफ करत नाही"
"पुन्हा चूक"गुरू परत विजयानंदात उद्गारतो , " बघ विजय केवळ प्रोग्रॅमिंगचे ज्ञान असणे हे तपासणी शास्त्र शिकण्यासाठी पुरेसे नाही. एक साधी गोष्ट का लक्षात घेत नाहीस की एकाच धुराड्यातून दोन माणसे उतरली तर एकाचे काळे तोंड झाले तर दुसऱ्याचे  मात्र स्वच्छ राहील हे कसे शक्य आहे?
  "तपासणी करणाऱ्याला एक गोष्ट माहीत हवी की तपासणीसाठीच्या आवश्यक गोष्टी  दिसायला सारख्याच दिसल्या तरी ग्राहकाच्या अपेक्षा मात्र प्रत्येकवेळी बदलत असतात."