मन ओढाय..

भासे मज मी कीटक कधी, नसे अस्तित्वाची जाण,
कोळिष्टकाचे पाहूनी चमकते दवबिंदू, 
मन ओढाय ओढाय.. 
मज ते ओढाय ओढाय..
वाटे कधी नीरस हा किनारा, नसे पूर्णत्वाची जाण,
सागराचे पाहूनी अथांग - उधाण,
मन ओढाय ओढाय.. 
मज ते ओढाय ओढाय..
देव्हाऱ्यातली पणती मी कधी, नसे पावित्रतेचे भान,
वणव्याचे पाहूनी जहाल तांडव नरातनं,
मन ओढाय ओढाय.. 
मज ते ओढाय ओढाय..
भिंतीवरचा आरसा मी बिलोरी, नसे कर्तृत्वाचे भान,
चित्रावरचे पाहूनी रंग मखमली,
मन ओढाय ओढाय.. 
मज ते ओढाय ओढाय..