आरास रास

अथांगास काय हिरे माणके सभोवर
कनक रुप्याची आरास रास अंगभर
तरी त्यास मोहवे मोर पाचुवांचा
सद्गदीत धरा सवे मेघ आळवांचा

सकाळी सकाळि मोतियांचे धुके-
स्फटिक माळून उभे शिरी तृणांचे तुरे
सोनकिरणांतुनी ओघळे इंद्रमाया नि
उधळे जगी रंग चित्त झुंझवाया

ऋणांचे खळे आगळे वेगळे-
स्नेह वाटे परी गोत हे सोवळे
आंसवांना नसे दु:ख खारे इथे
निर्झराचे पिसे अवखळे खळे

.................अज्ञात