"असे बबनराव"
बबनराव जेव्हा निवडणूकीला उभे राहिले।
लोकांना मोठे आश्चर्य वाटले ॥
त्यांचे चिन्ह यावेळी दुसरे होते ।
पक्ष केव्हा बदलला हे कोणाला माहीत नव्हते ॥
लोकांनी मनांत निश्चय केला ।
बबनरावांना यावेळी मारू टोला ॥
बबनराव घरोघरी फिरत होते ।
मला मत द्या असे सांगत होते ॥
लोकांनी बबनरावांना मत दिले नाही ।
ते निवडून आले नाही ॥
याबद्दल त्यांचे चेहऱ्यावर दुःख नव्हते।
विजयी उमेदवाराचे मिरवणुकीत,
ते"टोपी" बदलून नाचत होते ॥
अनंत खोंडे.
२।११।२०११.