मुंबईची शान
चिमणी कपड्यांच्या गिरणीची
धुर सोडताना
अनेक संसार लख्ख करणारी
सोन्याची चिमणी
उडाल्या असंख्य चिमण्या
चिमणीतून
अनेक संपलेले चिवचिवाट
कोण जाणे कोठे अदृश्य झाले
खरी चिमणी
आहे कोणी पाहिली
ती आता दुर्मिळ झाली
जग आता फक्त कावळ्यांचे
संपले सारे
चिमण्यांची राख
मजुरांच्या अस्थी
चिव काव चिव काव
कण्हते चिमणी शवदाहिनीची