पुसट धनरेषा

पुत्र सरस्वतीचा

ना लक्ष्मीचा,
तेजस्वी ललाटरेषा
पुसट धनरेषा
पापे पुर्वीची
लक्ष्मी ना पावते
एक पावते 
दुसरी रागावते
जीभेवर सरस्वती
वाट अडवते
पोटाची खळगी
पैशाचे मृगजळ
दारिद्र्य वैचारिक
अंगावर दागिने
दारिद्र्य आर्थिक
जिभेवर सरस्वती
भांडणे देवींची
मरण माणसाचे