चातक

काळे भोर ढग झाले,
अजून पाणी पडले नाही?
प्रेम माझे तुझ्यावर आहे,
अजून तुला कळले नाही?

ठिणगी केव्हाच पडली जगलात
अजून वणवा पेटला नाहि?
सदेश माझ्या प्रेमाचा,
अजून तुजला भेटला नाही?

प्रेम एवढे करतो  तुला,
डोळे तुझी वाट पाही
क्षणभर नाही भेटलिस प्रिये
नक्किच प्राण माझा जाई

प्रेम एवढे हृदयात माझ्या
मी सागु शकत नाही
विचार माझ्या तळमळत्या हृदयाला
तुझ्या विना मी जगू शकत नाही

जरी मी प्रेम व्यक्त करू शकलो नाही,
तरी समजून घे ना,
हृदयाचा ठोका चुकला प्रिये.....
आता तरी होकार दे ना............?