मिरा

मीरा

घेऊन एकतारी
गाते रे मुरारी
प्रेमात तुझ्या हरी
झाले मी निलाजरी

देई विषाचा प्याला
राणा हा संसारी
नाम घेता श्रीहरी
अमृत होई अधरी

मनमोहक रुप तुझे
शेला हा भरजरी
लेऊन धवल वस्त्रे
आळवते मी वैखरी

राजेंद्र देवी