बीटाचा हलवा

  • २ मध्यम आकाराचे बीट
  • १ वाटी साय
  • साखर अर्धी ते पाउण वाटी
  • तुप १ मोठा चमचा
  • वेलदोडा पुड चिमुटभर
  • बदाम २ (ऐछीक)
१० मिनिटे
२ ते ३ लोकांना

बीट बारीक किसून घ्यावे.

तुपावर परतून शिजवून घ्यावे.
नंतर त्यात साय व साखर घालावी.
२ मिनिटांनी वेलदोडा पावडर घालावी.
वाढताना त्यावर बदामाचे काप पेरावे.

बीट व गाजर एकत्र करून देखील हलवा चांगला होतो.

 
मुले बीट खायला कंटाळतात पण हा हलवा आवडीने खातात.