निरभ्र अंबर

हे निरभ्र अंबर

किती निळं सुंदर

वाटते असे होऊन पिसे

करू मुक्त विहार

सुनाट मार्गी एकाकीच मी

स्वच्छंद बागडते

किती साठवू निळाईला या

नजर संभ्रमिते

सर्वच हृदयी सामाविण्याला

सृष्टीच बनावे

हळुच अलगद तनुतून

निसटूनी जावे

मग मिळवू बेबंध हर्ष

अविट मधुतर

हे निरभ्र अंबर

किती निळं सुंदर

वाटते असे होऊन पिसे

करू मुक्त विहार