" नेते खातसे "
नेते खात असे ठायी ठायी ।।ध्रु॥
जनहिताच्या कल्याणाची, त्यांना पर्वा नाही ॥ध्रु॥
कुणी खातसे मिळूनी चारा ।
कुणी लाटती भुखंड सारा ॥
आदर्शाच्या "घोटाळ्याची"२, फाइल सापडतं नाही ॥१॥ध्रु॥
योजनांचे दावून गाजर ।
त्यात करितसे भ्रष्टाचार ॥
ओरडली किती" जनता जरी ही"२, धाक त्यांना नाही ॥२॥ध्रु॥
कुणी न येथे भला चांगला ।
जो तो खाण्यामध्ये गुंतला ॥
धडा शिकवण्या "या नेत्यांना"२, एकजूट तू होई ॥ध्रु॥३॥
अनंत खोंडे.
२१।११।२०११.