विरहगीत

विरहगीत

चंदेरी स्वप्नांच्या
ठिकऱ्या उडाल्या
चांदण्या बनून
आकाशात विखुरल्या

थकल्या डोळ्यातून
अश्रू पाझरले
धुके बनून
आसमंतात पसरले

खोल मनाच्या गर्भात
आठवणींचे बीज अंकुरले
विरहगीत बनून
नभात हुंकारले

राजेंद्र देवी