पौर्णिमा नको मला अजून चांदण्यात मी

पौर्णिमा नको मला अजून चांदण्यात मी
सावली दिली तुला नि राहिलो उन्हात मी

आत्म बोध दे मला नकोत श्वास खेळते
घेतले कितीक जन्म व्यर्थ "मी" पणात मी

शोधती तुला मला उगाच या दिशा दिशा
भेटतो तुला अता मनातल्या मनात मी

का? वठूनही मनास पालवी फुटे नवी
पाहतो तुझे हृतू असून कुंपणात मी

या मुळे तरी मिळेल दाद मो़कळी मला
कोंडले तुलाच आज मोकळ्या स्वरात मी

...... मयुरेश साने