पिठाच्या मिरच्या

  • १ वाटी चण्याच्या डाळीचे पिठ,
  • मसालाचे साहित्य
  • अर्धी वाटी चिरलेली कोथंबीर
  • जाड- मिरच्या (१०/१२)
१५ मिनिटे
१०/१२ मिरच्यांसाठी

पिठाच्या भरलेल्या मिरच्या करतांना मिरच्या जास्तीत जास्त जाडीच्या निवडाव्यात (सिमल्या मिरच्या नकोत).

डाळीच्या पिठात - मीठ, हळद, हिंग - मोहनाला (१ टेबलस्पून) तेल चांगले एकजीव करावे. त्यात चिरलेली कोथंबीर मिसळावी.

मिरच्यांना उभी १/१ चीर फाडावी ( प्रत्येक मिरचीला कुठल्याही एका बाजूने एक चीर) सर्व मिरच्यांना एकदम चिरू नये.  एक एक मिरची चीरत जाऊन त्यात मसाला भरीत जावे.

कढईत फोडणीला तेल तापत ठेवावे (आवश्यकते नुसार). तेल तापले की त्यात मोहरी हिंग व थोडी हळद टाकावी. नंतर मिरच्या भाजी टाकतो तश्या त्या तेलात टाकाव्या. (फूटत/तडतडत नाहीत). गॅस मंद विस्तवावर ठेवून वर झाकण ठेवावे (वाफ देण्यासाठी ) अधून मधून हलक्या हाताने खाली वर कराव्यात. शिजल्या की गॅस बंद करून वाफ मोडू द्यावी.    

ह्या मिरच्या फ्रिज मध्ये ३/४ दिवस चांगल्या टिकतात. पण गरम गरम ताव मारण्यास अधिक उत्कृष्ठ.  

 

शक्यतो नॉन स्टिक भांडी वापरावीत म्हणजे जळणार नाहीत.

मिरच्या मध्यम तिखट किंवा मुळचट घ्याव्यात - अती तिखट टाळाव्यात.

मिरच्यांचा जो पहिला बहर येतो त्या मिरच्या बhuतेक तिखट नसतात असा माझ्या आईचा अनुभव आहे.

आई