आसुया

पानगळीची किमया; सारे विवस्त्र वक्ष तरूंचे हे
नक्षत्रांची नक्षी जणु की निळ्या अंबरी मय भासे
डौल लास्य कमनीय विशाखा चित्र रमलतम रेषांचे
चित्रकार अवघ्या विश्वाचा थबकल्यापरी आभासे

प्राण प्रियेचे विरही झुरले; सुकले तट का पानांचे ?-
की कात टाकली नवजन्मास्तव उबवित अंकुर पंखांचे ?

मज दिसतो रजशृंगार कळीचा मी भृंगासम अवतरतो
समक्ष बघतो तृप्त नहाणे अंतर्यामी उलगडतो
गुणगुणतो गाणे स्वप्नांचे नवी आवरणे पांघरतो
सृजनकल्प आसुया जगण्याची वाटेवरती अंथरतो

........................अज्ञात